वजन कमी करण्यासाठी करा हा परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील







वजन कमी करण्यासाठी करा हा परफेक्ट डाएट Weight Loss Diet Plan Marathi वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन [T_Ym2rjgcK5]

वजन कमी करण्यासाठी करा हा परफेक्ट डाएट Weight Loss Diet Plan Marathi वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन [T_Ym2rjgcK5]

| 1h 28m 28s | Video has closed captioning.

वजन कमी करण्यासाठी करा हा परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल Weight Loss Diet Plan in Marathi वजन कमी करायचंय? पहाटेपासून ते रात्रीपर्यंत फॉलो करा या गोष्टी #पोटाचीचरबी #वजनकमीकरण्यासाठी #WeightLoss एखादा आवडता ड्रेस घट्ट झाल्यानंतर डाएट करण्याचा विचार १०० पैकी ९५ मुली तरी नक्कीच करत असतील आणि मग झिरो फिगर मिळण्याच्या नादात अनेक जण उपवास करु लागतात. पण बारीक असणे म्हणजे परफेक्ट फिगर नाही. तर परफेक्ट फिगरचीरही काही माप आहेत. या परफेक्ट फिगरमध्ये तुम्ही कुपोषित किंवा थकलेले दिसत नाही. तर या परफेक्ट फिगरमध्ये तुमच्या बॉ़डी शेपसोबतच तुमच्या चेहऱ्यावरही तेजही येते. आज आम्ही तुम्हाला परफेक्ट फिगरसाठी परफेक्ट असा डाएट सांगणार आहोत.जो तुम्हाला करणे अगदीच सोपे आहे जो महिन्याभरातच तुमच्यामध्ये बदल घडवून आणेल. असा हा परफेक्ट डाएट आपल्यासाठी Alice Weight Loss Clinic यांनी सांगितला आहे. या डाएटसोबत त्यांनी काही टीप्स देखील दिल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन Weight Loss Diet Plan In Marathi सकाळी उठल्यानंतर काय कराल? सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला बेड टी किंवा कॉफी प्यायची सवय असेल तर ती थांबवा आणि सकाळी सकाळी बेडमधून बाहेर आल्यावर म्हणजेच उपाशी पोटीकोमट पाण्यात लिंबाचा रस घालून एक ग्लासभर पाणी घ्या. तुमच्या शरीरासाठी हा नवा बदल चांगला आहे. पण प्रत्येक गोष्टीची शरीराला सवय नको म्हणून साधारण एक महिन्यांनी यात बदल करा. एक महिन्यानंतर ग्रीन टी सुरु करा. आणि त्यानंतर ब्लॅक कॉफी प्यायली तरी चालेल. पण लक्षात ठेवा महिन्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्यात याची सवय बदलायची आहे. आता वेळ नाश्ताची सकाळी उठल्यावर नाश्ता करण्याची अनेकांना सवय नसते. पण लक्षात ठेवा नाश्ता हा सुद्धा नाश्त्याचा महत्वाचा भाग आहे. आता नाश्तामध्ये काय खायचे असा प्रश्न असेल तर आठवड्याभरासाठी एक वेळापत्रक बनवून ठेवा. सोमवार - पोहे मंगळवार - उपमा बुधवार - ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड आणि पीनट बटर गुरुवार - ओट्स शुक्रवार - ब्राऊन ब्रेड आणि अंड्याचे आम्लेट किंवा उकडलेली अंडी शनिवार - पोहे रविवार - उकडलेली अंडी किवा स्क्रॅमबल्ड एग्ज पुन्हा भूक लागली? घरुन नाश्ता करुन निघालो तरी देखील ऑफिसमध्ये गेल्यावर काहीना काही नक्कीच खावेसे वाटते. अशावेळी तुम्ही शेंगदाण्याची चिक्की, शेंगदाणे किंवा मग फळे खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला लागलेली भूक शमेल. यावेळी थोडा तजेला येण्यासाठी ब्लॅक कॉफी घेतली तरी चालू शकेल. दुपारच्या जेवणाचे काय? असं म्हणतात की, दुपारचे जेवण हे राजासारखे आणि रात्रीचे जेवण हे भिकाऱ्यासारखे असायला हवे. ते अगदी खरे आहे. कारण दुपारी सगळेच कामात असतात. अशावेळी जेवण रात्रीच्या तुलनेत दुपारी अधिक पचतं आणि शरीराला लागते. जर तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी असा साग्रसंगीत डबा नेत असाल तर फारच छान. कारण हेच जेवण योग्य आहे. शरीराला आवश्यक प्रमाणात प्रोटीन असते. त्या निमित्ताने तुम्ही भाज्याही खाता. संध्याकाळी काय खाल? दुपारी १ वाजता जेवल्यानंतर साधारण चार- एक वाजता पुन्हा पोटात भुकेची कावकाव सुरु होते. मग असावेळी भरपूर लोक शेवपुरी, पाणीपुरी, सॅण्डवीच असे काही पदार्थ खाल्ले जातात. पण आजपासून ते बंद करायचे आहे. हे लक्षात घेऊन तुम्हाला संध्याकाळी भूक लागल्यानंतर फळे खायची आहेत. यामध्ये तुम्हाला पोटभरीची फळे हवी असतील तर कलिंगड, केळ,पपई, असे काही तरी खा. या शिवाय उकडलेले अंड, शाकाहारी असल्यास एक ते दोन छोटे क्युब वाफवलेलं पनीर असं काहीतरी खा. रात्रीच्या जेवणाची वेळ महत्वाची नोकरीमुळे जेवणाच्या वेळा पाळणे शक्य नाही. हे अगदी खरे आहे. रात्रीचे जेवण हे ८.३० नंतर होता कामा नये. या जेवणात भाजी पोळी असून द्या. भात यावेळी टाळाच. जर तुम्ही रात्री अंड खाणार असाल. तर अंड्याच्या पांढऱ्या बलकाचे आम्लेट करुन खाल. या शिवाय जर तुम्हाला दूध आवडत असेल तर मिल्कशेक करुन प्या. बदाम आणि फळांचे मिल्कशेक हे रात्रीच्या वेळी पूरक अन्न असते. यातून तुम्हाला प्रोटीन मिळते. रात्री कमी खाण्याचे कारण इतकेच असते की, त्यावेळी तुमच्या सगळ्या शारिरीक क्रिया मंदावलेल्या असतात. साहजिकच तुमची पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणून रात्री थोडं कमीच जेवावे. डाएटची सुरुवात केल्यानंतर Diet Tips in Marathi १. आता एखादा नवा बदल करायचा म्हटलं की, थोडा फार त्रास होणारच. साधारण एक आठवडाभर तुम्हाला तुमचे पोट भरलेच नाही असे वाटेल.काहीतरी कमी कमी वाटेल. अरबटचरबट खाण्याची इच्छा होईल पण ते अगदीच सर्वसाधारण आहे. एक गोष्ट तुम्हाला सारखी लक्षात ठेवायची आहे की, तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायची आहे. भूक लागतेय म्हणून काहीही खाण्यापेक्षा चांगले खा, असे आपल्या मनाला वारंवार समजावून सांगायचे आहे. डाएटचा परीणाम तुमच्या शरीरावर तर होईलच पण तुमची त्वचा नितळ होऊ लागेल आणि हा बदल तुम्हाला नक्कीच तुम्हाला हवाहवासा वाटेल. कारण चांगली नितळ त्वचा कोणाला आवडत नाही. २. डाएट म्हणजे उपाशी राहणे नाही. फक्त वेळा पाळणे आणि योग्य आहार घेणे असे आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आता जर तुम्ही किती खायचे याचा विचार करत असाल तर पोट अगदी पूर्ण भरेपर्यंत खाऊ नका. पोटात थोडी जागा असू द्या. डाएट तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार खाण्यासाठी प्रवृत्त करत असते. ३. डाएट केल्यानंतर बदल लगेच दिसून येत नाही. बदलाला थोडा वेळ जातो. त्यामुळे लगेचच ते बंद करु नका. तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही त्यात बदल करु शकता. म्हणजे खाण्याचा अगदीच मोह आवरत नसेल तर आठवड्यातून एकदा तुम्हाला खावासा वाटणारा पदार्थ खायला हरकत नाही. पण तो अगदी खूप दिवस उपाशी असल्यासारखे खाऊ नका. उदा. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, कोल्ड्रींक असे काही खावेसे वाटत असेल तर खा. पण मापात खा. Alice Weight Loss clinic is specialist in weight loss and fat loss in marathi. #diet pills shark tank #weight loss pills from mexico #weight loss pills women #bioscience keto gummies oprah

Aired: January 05, 2025

Rating: TV-14

Buy Now:

Problems Playing Video? | Closed Captioning

Learn About Midwifery Today

Blog

Learn About Midwifery Today

Read the Modern Day Midwives Blog and learn more about our bloggers, all experienced midwives.

Read now